भुसावळातील लाडक्या बहिणींशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला संवाद


Deputy Chief Minister Devendra Fadnavis interacted with beloved sisters in Bhusawal भुसावळ (20 ऑगस्ट 2024) :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमप्रसंगी थेट प्रक्षेपणाद्वारे भुसावळ विधानसभेतील लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांची होती उपस्थिती
भाजपाचे शहराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, भाजपा जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भालचंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, लाडकी बहिण योजनेचे भुसावळ तालुकाध्यक्ष राजेंद्र आवटे, तालुका सरचिटणीस आनंद ठाकरे, राजेंद्र नाटकर, किरण कोलते, गिरीश महाजन, देवा वाणी, प्रमोद नेमाडे, गुणवंत बोरोले, माजी नगरसेविका मीना लोणारी, महिला आघाडी भुसावळ तालुकाध्यक्षा चेतना भिरूड, भुसावळ शहराध्यक्षा अनिता आंबेकर, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, सागर वाघोदे, यतीन ढाके, उद्धव झांबरे, गौरव लोणारी, प्रवीण कुटे, संजू विश्वकर्मा, मयूर चिनावलेसह असंख्य पदाधिकारी व हजारो माता भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थिती होती.


भुसावळ विधानसभेत पुन्हा चौकार मारणार
यावेळी उपस्थित भगिनींनी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांना राख्या बांधल्या. आपणच या मतदारसंघात चौकार मारणार, असे आश्वासनही लाडक्या बहिणींनी दिले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून आलेल्या सर्व लाडक्या माता-बहिणींचे लाडू वाटून तोंड गोड करण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !