तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 50 वर्षीय आजीसह नातवाचा मृत्यू


A 50-year-old grandmother and her grandson died in a leopard attack in Taloda taluka तळोदा (21 ऑगस्ट 2024) : बिबट्याच्या हल्ल्यात 50 वर्षीय आजीसह नातवाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तालुक्यातील काजीपूर शिवारात घडली. आठवड्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा मृत्यू ओढवल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

आधी नातवावर नंतर आजीवर हल्ला
काजीपूर शिवारात अतूल सूर्यवंशी यांच्या शेतात भगदरी येथील कुटुंब खवालदार म्हणून कामास आहे. नेहमीप्रमाणे साखराबाई खेमा तडवी (50) या मंगळवारी दुपारी दोन वाजता बकर्‍या चारण्यासाठी गेल्या मात्र उशीर होऊनही आजी घराकडे आली नसल्याचे पाहून त्यांची मुलगी बोकाबाई व नातू साहील व सात वर्षीय दुसरा नातू श्रावण शिवाज्या तडवी हे साखराबाईच्या शोधात पाच वाजेच्या सुमारास शेताकडे गेले. यावेळी बिबट्याने अचानक हल्ला करीत श्रावणला शेताकडे ओढून नेले. नातवाच्या आवाजानंतर आजी साखराबाई धावत्या असता त्यांच्यावर बिबटयाने हल्ला केल्याने त्यांचाही मृत्यू ओढवला.

नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त व्हावा
आजूबाजूच्या शेतातील रखवालदारांनी धाव घेतल्यानंतर त्यांना दोघांचा मृतदेह आढळला. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळोदा उपाजिल्हा रुग्नालयात नेण्यात आला. आठवडापूर्वी चिखनोदा येथे बिबट्याच्या बालकाचा मृत्यू झाला होता. पुन्हा बिबट्याने दोघांचा बळी घेतल्यानंतर वनविभाग तातडीने बिबट्यावर जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.


कॉपी करू नका.