जळगावात पंतप्रधानांचा दौरा : 22 ते 25 दरम्यान जळगाव विमानतळापासून ‘नो फ्लाईंग झोन’

व्यावसायीक उड्डाणे राहणार बंद ः जिल्हाधिकार्‍यांनी काढले आदेश


Prime Minister’s visit to Jalgaon: ‘No Flying Zone’ from Jalgaon Airport from 22nd to 25th जळगाव (22 ऑगस्ट 2024) : ‘लखपती दीदी’ राज्यस्तरीय मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौर्‍यावर येत आहेत. या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किमीच्या परिघात, 205741 एन, 0753729 ई आणि वरील निर्देशांकाच्या जमिनीपासून चार फूट अंतराचा परिसर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत ‘नो फ्लाइंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहेत.

व्यावसायीक उड्डाणांनाही बंदी
ड्रोन, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाईट्स, खाजगी हेलिकॉप्टर, पॅरामोटर, हॉट एअर फुगे इत्यादींच्या उड्डाणांवर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या जळगाव दौर्‍याशी संबंधित महत्वाच्या/अति महत्वाच्या व्यक्तींचे विमान उड्डाणे वगळता व्यावसायीक विमानांचे उड्डाण 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !