धुळ्यातील लाचखोर वेतन अधीक्षक पोलीस कोठडीत
एसीबीच्या चौकशीनंतर अधीक्षकेचे तोंडावर बोट ः मालमत्तेची होणार तपासणी
Bribery pay superintendent of Dhula in police custody धुळे (22 ऑगस्ट 2024) : थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी (41, अभियंता कॉलनी, वाडीभोकर रोड, गणपती मंदिराजवळ, धुळे मुळ रा.मु.पो.लोणी, ता.आर्णी, जि.यवतमाळ) यांच्यावर धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच कारवाई केली तर दुसर्या दिवशी बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी गिरी यांना धुळे न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
40 लाखांचे घबाड जप्त
धुळ्यातील शिक्षक दाम्पत्याचा एप्रिल 2022 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा 3 व 4 हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाल्यानंतर तो अदा करण्यासाठी धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी यांनी मंगळवारी दोन लाखांची लाच मागितल्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून त्यांना सायंकाळी कार्यालयात पकडण्यात आले. कारवाई उशिरापर्यंत चाललने दुसर्या दिवशी बुधवारी त्यांना अटक करण्यात आली तर मंगळवारी रात्री एसीबीने अभियंता कॉलनीतील घराची झडती घेतल्यानंतर त्यात सुमारे दहा लाखांची रोकड व 300 गॅ्रम पिवर सोने सापडल्याने ते जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाचे मूल्य सुमारे 40 लाख इतके आहे..





