विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश : एमपीएसी परीक्षा पुढे ढकलली
Success of students’ protest: MPAC exam postponed मुंबई (22 ऑगस्ट 2024) : विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवार, 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्यात आली असून लवकरच नवीन तारीख परीक्षेची जाहीर करण्यात येणार आहे.
आयोगाच्या अध्यक्षांचा आभारी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
न गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने दोन्ही परीक्षा देणार्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाल्याने आंदोलनाची दखल घेत आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.




