शिवाजी बुधवंत नवापूरचे नूतन पोलीस निरीक्षक : नंदुरबार पोलीस दलातील 13 अधिकार्‍यांच्या बदल्या


Transfers of 13 officers in Nandurbar Police Force नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सात निरीक्षकांसह सहा सहाय्यक निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी बदल्या केल्या आहेत.

सात निरीक्षकांच्या बदल्या
शहाद्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची नवापूर पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षाचे सुनील भाबड यांची नंदुरबार शह पोलीस निरीक्षकपदी, नियंत्रण कक्षातील विवेक पाटील यांची नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तसेच नियंत्रण कक्षातील गुुलाबराव पाटील यांची अक्कलकुवा पोलीस ठाण्यात, तळोद्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र जगताप यांची धडगाव पोलीस ठाण्यात तर धडगावचे इशामोद्दिन पठाण यांची नियंत्रण कक्षात व नंदुरबार शहरचे वासुदेव देसले यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.

सहा सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
म्हसावदचे राजेंद्र मोरे यांची शहादा पोलीस ठाण्यात, शहाद्याचे गणेश वारुळे यांची म्हसावद पोलीस ठाण्याचे अक्कलकुवा ठाण्याचे राजू लोखंडे यांची तळोदा पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील संदीप आराक यांची सारंगखेडा पोलीस ठाण्यात, नवापूरचे नरेंद्र साबळे यांची विसरवाडी पोलीस ठाण्यात तर नियंत्रण कक्षाचे धर्मराज पटले जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.