रामगिरी महाराजांविरोधात भुसावळात मुस्लीम बांधवांचा मोर्चा

तहसील प्रशासनाला निवेदन आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात गुन्हा दाखलची मागणी


Muslim brothers’ march against Ramgiri Maharaja in Bhusawal भुसावळ (24 ऑगस्ट 2024)  सरलाबेट, ता.वैजापूर येथील रामगिरी गुरु नारायण गिरी महाराजांनी पंचाळे, ता.सिन्नर येथील प्रवचनात मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाविषयी अपशब्द वापरून मुस्लीम समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. रामगिरी महाराजांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शहरातील हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत शुक्रवारी तहसील कार्यालयावर मूक निषेध मोर्चा काढला. मोर्चेकर्‍यांच्या हातात निषेधाचे मोठ्या प्रमाणावर फलक होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता रजा टॉवरपासून मोर्चाला सुरूवात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक, बाजारपेठ, गांधी पुतळामार्गे मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदारांनी निवेदन देण्यात आले.

भर पावसातही उत्साह कायम
शुक्रवारी दुपारी पावसाला सुरूवात झाली मात्र या पावसात मोर्चेकर्‍यांचा उत्साह कमी झाला नाही. मूक मोर्चा शहरातील विविध मशिदींच्या मौलाना यांच्या मार्गदर्शनाखाली काढणयात आला. हजारो मुस्लीम समाजबांधव यात सहभागी झाले.


यांचा मोर्चात सहभाग
मौलाना रेहान रजा, मौलाना अब्दुल हकीम नईमी, हाफिज गुलाम सरवर, मुफ्ती नजीर साहब, हाफिज मोहम्मद सुलतान, मौलाना अब्दुल साहब, मौलाना जुल्फेखार मिस्बाही, हाफिज मोहम्मद सुफियान रजा, मो.कासीम, हाफिज रईस नक्षबंदी, शोएब रजा, मोहम्मद शोएब रजा, मो.लुकमान आदींच्या नेतृत्वात आशिक सेठ, माजी नगरसेवक साबीर मेंबर, जुनैद खान, सलीम पिंजारी, शफी पहेलवान, मुन्ना तेली, अख्तर पिंजरी, निसार शेख, फिरोज खान, रऊफ ठेकेदार, युनूस मामा, सलीम सेठ व हजारो समाजबांधव सहभागी झाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !