मुलगा-सुनेला सांगितले घराकडे लक्ष ठेवा : दीड तासाने धडकली आई, भावाच्या मृत्यूची बातमी

नेपाळमध्ये बस अपघात वरणगाव येथील जावळे, सरोदे, भारंबे आणि तळवेलच्या राणे कुटुंबावर काळाचा घाला


Nepal Bus Accidant भुसावळ (24 ऑगस्ट 2024) : ‘बेटा आम्ही सर्व जण आता पोखरा येथून काठमांडूला जातोय. खूपच आनंददायी प्रवास होतोय. बाळा योगेश, आर्या मजेत आहेत का? सुनबाई घराकडे नीट लक्ष ठेव. आम्ही लवकरच परत येऊ’ असे विजया कडू जावळे यांचे मुलगा योगेश आणि सुनेसोबत झालेले संभाषण अखेरचे ठरले. आई बोलण्यापूर्वी लहान भाऊ सागरदेखील मोठ्या भावाला क्षेमकुशल विचारले. पण अवघ्या काही वेळाने अपघात होऊन नेपाळमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. त्यात विजया व सागर या माय – लेकाचा देखील समावेश असल्याची माहिती वरणगावात धडकली.

नदीत कोसळली बस
शुक्रवारी सकाळी पोखरा येथून काठमांडूकडे जाताना 9.30 वाजता सागर कडू जावळे (रा.वरणगाव) यांचा मोठे बंधू योगेश यांना पोखरा येथून मोबाइलवर कॉल आला. दादा, आम्ही पोखरा येथून काठमांडू जात आहोत. आम्ही सर्व जण मजेत आहोत, असे सांगितले. नंतर आई विजया जावळे 60) यांच्याकडे फोन दिला. त्यांनी मुलगा योगेशला पोखरा येथे मनोकामना माता मंदिरात दर्शन झाले. भुयारात असलेल्या एका मंदिरात सुद्धा दर्शन घेतले. आम्हाला खूपच आनंद वाटतोय असे सांगितले. नंतर नातवंडे कुशल, आर्या यांच्यासोबत ‘बाळा’ असे संबोधून लाडीवाळपणे बोलल्या. सुनबाई उज्ज्वला योगेश जावळे. यांना बेटा घराकडे नीट लक्ष ठेव. नंतर पुन्हा बोलेल असे सांगून कॉल कट केला. हे कुटुंबासोबतचे आई व मुलाचे संभाषण शेवटचे ठरले. यानंतर काही वेळाने अपघाताची वार्ता धडकताच जावळे परिवाराच्या पायाखालील वाळू सरकली.






भुसावळात सकाळी 11.20 वाजता माहिती
अपघातात मृत्यू झालेले सुधाकर जावळे यांचे जावई अमोल पाटील हे भुसावळात जुने सतारे भागात राहतात. त्यांच्या आई भारती रवींद्र पाटील (52) या देखील भाविकांसोबत गेलेल्या आहेत. त्यांनी सकाळी 11.20 वाजता मुलगा अमोल यांना फोन करून अपघात झाला. कुणाला तरी मदतीसाठी पाठवा, असा निरोप दिला. यानंतर दुपारी सव्वा वाजता पुन्हा काही सेकंद बोलणे झाले. या अपघातात अमोल यांच्या वहिनी नीलिमा सुनील भिरूड (45, रा.सुकदेव पाटील नगर) या देखील जखमी झाल्या.

जावळे कुटुंबीयांवर काळाचा घाला
या भीषण अपघातामध्ये वरणगाव येथील जावळे कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. सुधाकर जावळे, रोहिणी जावळे, सागर कडू जावळे, विजया कडू जावळे, भारती प्रकाश जावळे, निलिमा चंद्रकांत जावळे, पंकज भागवत भंगाळे (मकरंद नगर, वरणगाव) यांचा मृत्यू झाला. तर पंकज भंगाळे यांच्या पत्नी वर्षा जखमी झाल्या आहेत.

अशी आहेत मृतांची नावे
सुहास प्रभाकर राणे (45), सरला सुहास राणे (42, रा.तळवेल), चंदना सुहास राणे (19), मंगला विलास राणे (45), नीलिमा सुनील धांडे (57), तुळशीराम बुधो तायडे (62), सरला तुळशीराम तायडे (60), सुधाकर बळीराम जावळे (60), रोहिणी सुधाकर जावळे (51), सागर कडू जावळे (32), विजया कडू जावळे (60), भारती प्रकाश जावळे (60), नीलिमा चंद्रकांत जावळे (46), संदीप राजाराम सरोदे (50), पल्लवी संदीप सरोदे (43), गणेश पांडुरंग भारबे (40), सुलभा पांडुरंग भारंबे (60), मीनल गणेश भारंबे, परी गणेश भारंबे (6), पंकज भागवत भंगाळे (44), अनिता अविनाश पाटील (44), अनुप हेमराज सरोदे (28), सरोज मनोज भिरूड (54), प्रकाश नथ्थू सुरवाडे (52), आशा समाधान बाविस्कर, मुर्तुजा खान (बस चालक), रामजित मुन्ना (क्लिनर दोन्ही रा.गोरखपूर उत्तर प्रदेश) हे मृत आहेत तर गोकर्णी संदीप सरोदे (20) ही बेपत्ता आहे.

अपघातात 14 जण जखमी
कुमुदिनी रवींद्र झांबरे, शारदा सुरेश पाटील (50), आशा पांडुरंग पाटील (63), वर्षा पंकज भंगाळे (39), प्रवीण पांडुरंग पाटील (52), अविनाश भागवत पाटील (55), अनंत ओकार इंगळे (58), सुनील जगन्नाथ धांडे (62), रेखा प्रकाश सुरवाडे (40), हेमराज राजाराम सरोदे (56), रुपाली हेमराज सरोदे (50), आशा ज्ञानेश्वर बोंडे (38), भारती रवींद्र पाटील (52), ज्ञानेश्वर नामदेव बोंडे (60)

जखमी व मृतांना सायंकाळपर्यंत हलवणार
सूत्रांच्या माहितीनुसार, अपघातातील जखमी व मृतांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने जळगाव विमानतळावर आणण्यात येईल व तेथून त्यांना मूळ गावी आणण्यात येईल. शनिवारी सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !