अजितदादा म्हणाले : राज्यातील 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार !


Ajitdada said: 50 lakh women in the state will become millionaire Didis! जळगाव (25 ऑगस्ट 2024) : आपल्या राजकीय जीवनात लाखोंच्या संख्येने प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला आज पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आल्याने आपण भारावून गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येथे म्हणाले. जळगावात आयोजित लखपती दीदी मेळाव्यात त्यांनी महिलांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला असून त्यातील किमान 50 लाख महिलांना महाराष्ट्रात लखपती दीदी बनविण्यात येईल, असे ते म्हणाले.

प्रचंड पाऊस व मात्र महिलांचा उत्साह कायम
अजित पवार म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान जळगावात आल्यानंतर पाऊस असतानाही काना-कोपर्‍यातून महिला स्वागतासाठी उपस्थित राहिल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्वांच्या सहकार्याने 50 लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प करूया, असेही अजित पवार म्हणाले. महिलांवर कोणतीही जवाबदारी टाकली तर त्या यशस्वीपणे पेलतात, असेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.