बोकडाने तेल सांडल्याने रसलपूरला दोन गटात तुंबळ हाणामारी
रावेर (25 ऑगस्ट 2024) : बोकडाने तेल सांडल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दोन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी रावेर तालुक्यातील रसलपूर येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून 32 जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
दोन गटात तुफान वादावादी
बोकडाने घरातील पाच किलो तेल सांडल्याच्या कारणावरून भिका तडवी यांच्या घरासमोर दोन गटात वादावादी होवून दंगल झाली. चापटा, बुक्के, लाथा, दगड, लोखंडी पाईप, चेनव्हिलचा दंगलीत वापर झाला. यात सलीम तडवी व गंभीर तडवी दोघे जखमी झाले. याबाबबत सलीम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाजीम रहेमान खाँ, फिरोज रहेमान खॉ, रिजवान खॉ यांच्यासह 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या गटातर्फे शेख निजामुद्दीन शेख कुतुबुद्दीन यांनी फिर्याद दिली. भिका तडवी, रमजु तडवी, सलीम तडवी, हसन तडवी यांच्यासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.










