भुसावळात निळे निशाण संघटनेचे भर पावसातही उपोषण


भुसावळ (29 ऑगस्ट 2024)  : विधवा, परितक्ता, घटस्फोटित, अंध, अपंग व निराधार व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत तत्काळ समाविष्ट करावे, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केद्रात प्रसुतीसाठी येत असलेल्या महिलांच्या तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर नियु्क्त करावे, औद्योगिक वसाहतीत असलेल्या खाजगी कंपनीत तसेच वीज निर्मिती केंद्रात परप्रांतातून आलेल्या कंत्राटी कामगारांची होत असलेली पिळवणूक थांबवावी, स्थानिक बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे,बेघर लाभार्थींना प्रधान आवास योजनेतून घरांचा लाभ मिळावा, महिलांसाठी स्वच्छता गृहे वाढवावीत, हातभट्टीच्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी निळे निशाण संघटनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी बुधवार, 28 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर भर पावसात उपोषण केले.

भर पावसातही उपोषण कायम
शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या दूर करून महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी निळे निशाण संघटनेतर्फे तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना करण्यात आली. या उपोषणात जिल्हाध्यक्ष नंदा भावटे, तालुकाध्यक्ष निकिता भावटे, तालुका उपाध्यक्ष मनीषा लोखंडे, संपर्क प्रमुख मंदा साळवे, चांबाबाई अवसरमोल, रेखाबाई तायडे, सायाबाई इंगळे, मायाबाई शंभरकर आदींची उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !