महाराज आमचं दैवत ; विरोधकांनी राजकारण करू नये : मुख्यमंत्री
Maharaj is our god ; Opposition should not play politics : Chief Minister मुंबई (29 ऑगस्ट 2024) : शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून मी एकदा नव्हे अनेकदा माफी मागेन, महाराज आमचे दैवत आहेत, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने आम्हाला वेदना झाल्या आहेत. ही घटना व्हायला नको होती परंतु, या घटनेनंतर आम्ही काल बैठक घेऊन दोन समित्या नेमल्या. जो पुतळा पडला त्याची चौकशी केली जाईल तर दुसरी समिती ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने काम करेल.
कुणीही राजकारण करू नये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांच्या तीव्र भावना लक्षात ठेवून अजित दादांनी माफी मागितली. शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. त्यावर राजकारण होऊ शकत नाही त्यामुळे कोणीही राजकारण करू नये. आम्ही त्याच ठिकाणी नौदलाच्या मदतीने शिवरायांचा भव्य-दिव्य पुतळा उभारणार आहोत, अशी ग्वाही देतो.