भुसावळात शिवरायांच्या पुतळा विटंबनेचा महाविकास आघाडीतर्फे निषेध


भुसावळ (30 ऑगस्ट 2024) : मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त झाल्या आहेत. भुसावळातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनीदेखील पुतळा विटंबनेचा निषेध नोंदवला आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण दहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते मात्र पुतळा बसवण्याचे काम अनुभव नसलेल्या व्यक्तीस देण्यात आला व प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने अल्पावधीत हा पुतळा खाली कोसळला. हा महाराष्ट्राचा अवमान असल्याने राज्यातील जनतेत संतापाची भावना पसरली आहे. या घटनेची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेंद्र चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे निलेश महाजन, दीपक मराठे, दीपक धांडे, बबलू बर्‍हाटे, पप्पू जकातदार, नानाभाऊ पवार, नमा शर्मा, शरद जैस्वाल, रहिम गवळी, नबी पटेल, अमजद शेख, विशाल ठोके, दिलीप सुरवाडे, पप्पू बारसे, निखील सपकाळे, राजू भोई, एकनाथ धांडे, बापू रोणखेदे, पिंटू भोई, समाधान पाटील, विकास खडके, शरद जोहरे, चेतन चौधरी यासह महविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !