भुसावळात पथविक्रेता समितीची बिनविरोध निवड


Unopposed election of street vendor committee in Bhusawal भुसावळ (30 ऑगस्ट 2024)  : शहरातील पथविक्रेता (हॉकर्स) समितीच्या निवडणुकीत आठ जागांसाठी 9 जणांचे अर्ज दाखल झाले मात्र शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी आरीफ अ.रज्जाक यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या समितीची निवडणूक बिनविरोध झाली. महसूल विभागाने तब्बल सात दिवसानंतर गुरुवारी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.

हॉकर्स झोन समितीची निवडणूक बिनविरोध
पथविक्रेता समितीत 20 सदस्य असतील. यात आठ सदस्य हे हॉकर्स असतील तर 12 सदस्य हे पालिका, पोलिस, व्यापारी मंडळ यांचेही प्रतिनिधी असतील. या निवडणुकीत 26 ऑगस्ट मतदान होणार होते मात्र उमेदवारी माघार घेण्याच्या शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी आरीफ अ. रज्जाक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हॉकर्स झोन समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली. मात्र हा निकाल गुरुवार, 29 रोजी सात दिवसांनी जाहिर करण्यात आला.


प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान मोंदीची सभा, यानंतर विजयी झालेल्या सदस्यांचे प्रमाणपत्राची छपाईसाठी विलंब, अमळनेर येथून निवडणू्क निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांची स्वाक्षरी आणण्यासाठी झालेली धावपळ यामुळे ही प्रक्रिया लांबली. अखेर सात दिवसांनी गुरुवारी हॉकर्स सदस्यांना विजयी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी लोकेश ढाके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !