प्रोसिडिंगच्या नकला मिळाल्यानंतर बोदवडला विरोधी गटनेते जफर शेख यांचे उपोषण सुटले
माजी मंत्री एकनाथराव खडसे, अॅड.रवींद्र पाटील यांची उपस्थिती
बोदवड (30 ऑगस्ट 2024) प्रोसिडिंगच्या नकला मिळण्यासाठी शहरातील विरोधी पक्षाचे गटनेते शेख जफर शेख अल्ताफ यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू छेडले होते. तीन दिवसानंतरही उपोषण कायम होतेे. मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी जफर शेख यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली मात्र शेख हे मागणीवर ठाम होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी गटनेते जफर शेख यांची मागणी मान्य न करणार्या सत्ताधर्यांविरुद्ध तसेच मालमत्ता व पाणीपट्टी करावरती लावलेली शास्ती रद्द करण्यासह अनेक मुद्यांना धरून विरोधी पक्षाच्या नगरसेविका योगीता खेवलकर, नगरसेवक मुजम्मिल शहा, लतीफ शेख, हकीम बागवान, पूजा पारधी यांनी नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन सुरू केले. शहरातील सर्व जनतेचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेल्यानंतर सत्ताधार्यांनी दखल घेत इतिवृत्ताचा ठराव असलेले प्रोसिडिंग सभा लिपिकाकडे दिले व इतिवृत्ताच्या ठरावाच्या नक्कली उपोषणकर्ते गटनेते जफर शेख यांना माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, अॅड.रवींद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत दिल्यानंतर थेड पेयजल देवून उपोषण सोडवण्यात आले.
यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे, रवींद्र भैय्या पाटील, सरपंच कैलास चौधरी, नगरसेविका योगीता खेवलकर, निलेश पाटील, किरण वंजारी, तानाजी पाटील तसेच महविकास आघाडीच्या सर्व नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.





