भुसावळ येथील चेतन जैन यांची जळगाव जिल्हा शासकीय समितीवर निवड
भुसावळ (1 सप्टेंबर 2024) : शहरातील भाजपा जैन प्रकोष्ठचे विधानसभा समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते चेतन जैन यांची जळगाव जिल्हा शासकीय समितीवर निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली असून या समितीत जैन यांना स्थान मिळाले आहे.
निवडीचे पत्र प्राप्त
महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री व समिती अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे जैन समाजाच्या महत्वपूर्ण बैठकीतून जळगाव जिल्हा शासकीय समितीवर चेतन जैन यांची निवड ललित गांधी यांच्या शिफारशीनुसार झाल्याचे संदीप भंडारी यांनी सांगितले. निवडीचे पत्र नुकतेच चेतन जैन यांना प्राप्त झाले आहे. जळगाव जिल्ह्यातून एकूण आठ सदस्यांवर जबाबदारी सोपविल्याचे भंडारी यांनी सांगितले.

उत्कृष्ट काम करण्याचा मनोदय
जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, संचालक व उपसंचालक, सर्व शासकीय व निमशासकीय समिती सदस्य, स्थानिय सकल जैन समाज व विविध जैन संघ यांच्याशी समन्वय व चर्चा करून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार समाज उपयोगी उत्कृष्ट काम करण्याचा विश्वास चेतन जैन यांनी व्यक्त केला आहे.




