दुचाकीचा धक्का लागल्यावरून वाद : आडगावजवळ चाकू हल्ल्यात तरुण गंभीर ; जळगावातून तिघांना अटक

Controversy over being hit by a bike : Young Gambhir in a knife attack near Adgaon ; Three arrested from Jalgaon यावल (2 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील आडगावजवळ श्रीक्षेत्र मनुदेवी येथून दर्शन घेऊन परत येत असतांना शनी मंदिराजवळील गार्डनच्या पुढे दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाल व 21 वर्षीय तरुणावर दुचाकीवरील तिघांनी चाकूने हल्ला केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना जळगाव एमआयडीसी परिसरातून ताब्यात अटक करण्यात आली. हल्ल्यातील जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
हल्ल्यात तरुण जखमी
आडगाव, ता.यावलजवळ सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे. या मंदिरावर शनिवारी दर्शनार्थ प्रशांत किशोर धनगर (21, रा.चहार्डी, ता.चोपडा) हा तरुण आला होता. तो परत जात असतांना शनी मंदिराजवळील फॉरेस्टच्या गार्डन समोर दुचाकीचा धक्का लागला व दुचाकी (क्रमांक एम. एच.19 डी. यु. 6913) वरील तीन अज्ञात तरुणांसोबत त्याचा वाद झाला. या तरुणांनी त्याला शिवीगाळ करून थेट मारहाण केली आणि त्यातील एकाने धारदार चाकूने प्रशांत धनगर यांच्या पोटावर वार केला.
तिघा तरुणांविरोधात गुन्हा
यामध्ये प्रशांत हा गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. या हल्ल्यानंतर दुचाकीवरील हे तिघे तरुण तेथून पसार झाले. जखमी प्रशांत धनगर याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विवेक धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे,ह वालदार सागर कोळी करीत आहे
मध्यरात्री तिघांना अटक
या गुन्ह्यातील संशयित चेतन संभाजी सोनवणे, खुशाल शत्रुधन कोळी व सुरज नाना पाटील हे तिघे दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 डी. यु. 6913) घेऊन जळगाव एमआयडीसीच्या परिसरात एका घरात लपून बसले होते. मध्यरात्रीनंतर पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार अर्शद गवळी, वसीम तडवी, सागर कोळी या पथकाने एमआयडीसीच्या हद्दीत जाऊन मध्यरात्रीच्या तिघांना अटक केली.


