लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार योजनेचे 4500 रुपये
4500 rupees of the scheme will soon be deposited in the account of the beloved sisters मुंबई (2 सप्टेंबर 2024) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मात्र पहिल्या टप्प्यात अनेक महिलांच्या खात्यात रक्कम आली नाही मात्र त्यांच्या खात्यात आता लवकरच तीन महिन्यांचे चार हजार 500 रुपये जमा होणार आहेत.
दोन टप्प्यात लाभाचे वितरण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत. आतापर्यंत दोन टप्प्यांत या लाभाचे वितरण करण्यात आले आहे. 31 ऑगस्ट रोजी लाखों महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3 हजार रुपये जमा करण्यात आले.

परंतू, ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. लवकरच त्यांच्यादेखील खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे मिळून 4 हजार 500 रूपये जमा होणार आहे. तसेच ज्या महिलांना मागील दोन महिन्यांचे पैसे मिळालेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत.




