जे.पी.नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस-महाजन भाजपा पक्षात मोठे, त्यामुळेच रखडला प्रवेश : आमदार एकनाथराव खडसेंची टिका


जळगाव (5 सप्टेंबर 2024) : मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. भाजपमधल्या काही लोकांनी मला प्रवेशासंदर्भात संपर्क केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचाहस्ते माझा प्रवेश झाला मात्र या प्रवेशाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन विरोध करत असतील तर मला असे वाटतं जे.पी.नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि फडणवीस पक्षामध्ये मोठे असावेत, असा टोला आमदार एकनाथराव खडसे यांनी लगावला. आमदार खडसे यांना भाजपा प्रवेश रखडल्यानंतर त्यांनी वाढदिवसाला ठोस निर्णय घेण्याची वेळ आल्याचे म्हटले जाते तर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर टिकेचे बाण चालवत त्यांनी कुठलीतरी एक भूमिका जाहीर करावी, असा सल्ला दिला होता.

खडसे म्हणाले, भाजपात प्रवेश झाला मात्र जाहीर केलेच नाही
आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपा प्रवेशाबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की, भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नसल्याने कदाचित भाजपला माझी आवश्यकता नाही. मी काही अडचणींमुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या अडचणी अजून आहेत. तसं आश्वासन मला भाजपकडून देण्यात आलं होते मात्र भाजपला तर माझी गरज नाही. तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी आमदार आहे. आणखी चार वर्षे आमदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.








भाजपा प्रवेशाला दोन नेत्यांचा विरोध
आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, माझा भाजप पक्षप्रवेश हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, विनोद तावडे, खासदार रक्षा खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे आदींच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्याचे त्यांनी फोटोही काढले आहेत परंतु आपल्या अधिकृत प्रवेशाला महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा विरोध आहे. खडसे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा आपल्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचे सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

माझा मूळ पक्ष काय वाईट आहे?
भाजपाला माझी गरज नाही. तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी आमदार आहे. आणखी चार वर्षे आमदार आहे. भाजपने मला घेतले नाही तर मी राष्ट्रवादीत जाईन. जाईन म्हणजे मी राष्ट्रवादीचा सदस्य आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !