अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटलांची टीका

0

There is no worthless account like the Finance Ministry : Guardian Minister Gulabrao Patal’s criticism जळगाव (8 सप्टेंबर 2024) : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याविषयी शेलक्या भाषेत टीका केली. योजनेच्या फाइलचा प्रवास सांगताना अर्थ खात्यासारखे नालायक खाते नसल्याचे वक्तव्य करून थेट पवारांच्या कार्यपद्धतीवरच टीकास्त्र सोडत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

मी देखील पक्का : पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे तो किस्साच सांगितला
राज्यस्तरीय हातपंप, वीजपंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले. त्यात त्यांनी अर्थ मंत्रालयाकडे फाइल कशी रखडवली जाते, याची सविस्तरपणे माहिती दिली. फाइल मंजुरीसाठी होणारा उशीर, त्यांच्याकडून काढल्या जाणार्‍या त्रृटींमुळे काम करताना कसा विलंब होतो यावर भाष्य केले. त्यांना स्वत: आलेला अनुभवच त्यांनी जाहीरपणे कथन केला. ते म्हणाले की, आमची फाइल 10 वेळा अर्थ विभागाकडे गेली. पण मी पण पक्का आहे. खात्यात फाइल गेली की मी माणूस पाठवायचो. तिथे जाऊन आमची फाइल निगेटिव्ह होऊन बाहेर यायची. पण मी पाठपुरावा सोडला नाही.


कॉपी करू नका.