ईडीच्या छापेमारीत व्यावसायीकाच्या घरात सापडले सोन्याचे घबाड

0

ED’s raid found gold in the businessman’s house कोलकाता (8 सप्टेंबर 2024) : सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी स्वप्न साहा या व्यावसायीकाच्या घरात अलीकडेच छापेमारी केल्यानंतर घरात तब्बल नऊ किलोपेक्षा जास्त सोने सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी सोने आणि रोख रक्कमही जप्त केली आहे. व्यावसायीकाने ही माया नेमकी कुठून व कशा माध्यमातून जमवली ? याचा तपास केला जात आहे.

बँक घोटाळा प्रकरणात छापेमारी
कोलकातामधील बीई ब्लॉक येथे असलेल्या घरावर ईडीने धाड टाकली होती. सोने, रोख रक्कम आणि संपत्तीची कागदपत्रे ईडीच्या अधिकार्‍यांना घरात आढळून आली. हे सर्व अधिकार्‍यांनी जप्त केले असून, याची चौकशी केली जाणार आहे. एका बँक घोटाळा प्रकरणात ईडीने ही धाड टकाली होती.

साडेसहा कोटींचे सोने जप्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची झाडाझडती घेत असताना स्वप्न साहाच्या घरात 9 किलोपेक्षा जास्त सोने सापडले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 6 कोटी 53 लाख इतकी आहे. त्याचबरोबर घरात काही रोख रक्कम सापडली आहे. काही संपत्तीची कागदपत्रेही आढळून आली असून, हे सगळे बँक घोटाळ्याशी संबंधित असल्याचा ईडी अधिकार्‍यांना संशय आहे.


कॉपी करू नका.