तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू


A two-year-old girl died in a leopard attack in Taloda taluka तळोदा (9 सप्टेंबर 2024) : बिबट्यासह वाघाच्या हल्ल्यात तालुक्यात बालकासह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले मात्र पुन्हा एका बिबट्याने दोन वर्षीय बालिकेवर हल्ला चढवल्याने तिचा मृत्यू ओढवला. रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

डॉक्टरांनी केले मृत घोषित
दोन वर्षीय चिमुकली ही आपल्या घराबाहेर खेळत असताना आई घरात कामे करीत असताना अचानक आलेल्या बिबट्याने झडप घालून हल्ला केला व बालिकेला ओढून नेले. ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत अनुष्काला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. झेलसिंग कुटुंबियांनी अनुष्काला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

यापूर्वी दोन मुलं अन् महिला ठार
या पूर्वी बिबट्या आणि वाघाचा हल्यात दोन मुलं व एक महिलेचा मृत्यू ओढवल्यानंतर वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आलेत. त्यात दोन दिवसात तीन बिबटे सापडले होते. आता मात्र पुन्हा हल्ला झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.


कॉपी करू नका.