संजय राऊतांचा घणाघात : देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही !


Sanjay Raut’s attack: Devendra Fadnavis will not forgive you Maharashtra! नागपूर (11 सप्टेंबर 2024) : खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरात झालेल्या अपघातावरून पुन्हा जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्ही चार वर्षांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्या अटकेची तयारी करताय आणि तुमच्याच पक्षाच्या एका नेत्याच्या मुलाने दारू पिऊन गाडी चालवत दहा गाड्या चिरडल्या आणि लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही अभय देताय? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

काय म्हणाले संजय राऊत
खासदार राऊत म्हणाले की, तुम्ही स्वत: बिफ खायचं आणि रस्त्यावर लोकांचं मॉब लिंचिंग करायचं. अपघातग्रस्त गाडीतील तरुण जिथं गेले होते तेथील एका बारचं बिल मिळालं आहे. त्यामध्ये दारू, चिकन, मटन आणि बीफ कटलेटचंही बिल आहे. श्रावण आणि गणपतीत बीफ खाणारे हे लोक आपल्या सगळ्यांना हिंदुत्व शिकवत असतात, असेही राऊत म्हणाले


कायदा सर्वांना समान हवा
सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. कायदा सगळ्यांसाठी समान हवा. पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल. इतका घटीया गृहमंत्री या महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात कुठे आहे कायदा-सुव्यवस्था ?
दरम्यान, नागपुरात गृहमंत्र्यांच्या नाकासमोर इतका भीषण अपघात झाला आहे, 17-18 लोक रुग्णालयात दाखल आहेत, पण ज्या व्यक्तीच्या नावावर गाडी आहे, जो व्यक्ती आधी ड्रायव्हिंग सीटवर होता आणि नंतर तो बदलण्यात आला, त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. तुम्ही कसल्या कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टी करत आहात? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

नागपूरात हिट अ‍ॅण्ड रनचा थरार
रविवारी मध्यरात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडी कारने दोन कार व एका दुचाकीला धडक देत पळ काढला. या कारमधील दोघेजण मद्यधुंद अवस्थेत होते हे पोलिसांनी कबुल केले व या कारमध्ये बावनकुळेंचा मुलगा संकेतही होता, हे पोलिसांना मद्यधुंद तरुणांच्या चौकशीतून समजले. ऑडी कारमध्ये बावनकुळेंच्या मुलासह अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार होते मात्र अर्जुन व रोनीत हे दोघे मद्य प्राशन करून होते. या दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अर्जुन वाहन चालवत होता. या दोघांच्या चौकशीत अपघात झाला तेव्हा संकेतही होता व ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर बसला होता, असे समोर आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !