जळगाव तहसीलवर 22 रोजी मनसेची निदर्शने

जमील देशपांडे यांची माहिती ; आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा एक दिवस पुढे ढकलला
भुसावळ- मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते लोकशाही मार्गाने जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर निदर्शने करणार असून या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला जळगाव जिल्हा दौरा एक दिवस पुढे ढकलल्याचा दावा जिल्हा सचिव जमील देशपांडे यांनी येथे केला. मंगळवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचे व नागरीकांचे लोकप्रिय नेते असून मनसे कुणाच्याही धमकीला भीत नाही. यापूर्वीच कोहिनूर प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली असताना सरकार त्यांना टार्गेट करीत आहे. 22 रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले असून त्या दिवशी सकाळी दहा वाजता जळगावात निदर्शने करणार असल्याचे ते म्हणाले.
बैठकीस या पदाधिकार्यांची उपस्थिती
या बैठकीत जामनेर तालुकाध्यक्ष विलास राजपूत, भुसावळ तालुकाध्यक्ष डॉ.उमेश सपकाळे, भुसावळ शहराध्यक्ष विनोद पाठक, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, महिला शहराध्यक्ष रीना साळवी, महिला शहर उपाध्यक्षा हेमा माळी, योगीता, संदीप मांडोळे, मतीन पटेल, दशरथ सपकाळे, युवराज पाथरवट, राजेंद्रसिंग गील, विलास सपकाळे, विलास पारधी, संदीप हिवाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
