वरणगाव फॅक्टरीतील सुपरवायझरची आर्थिक वादातून भावाने केली हत्या
संशयीत वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील एके- 47 काडतूस चोरी प्रकरणातील आरोपी

A supervisor in Varangaon factory was killed by his brother due to a financial dispute भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : वरणगाव ऑर्डनन्समध्ये सुपरवायझर पदावर असलेल्या 48 वर्षीय इसमाची सख्या भावानेच प्लॉट विक्रीच्या वादातून डोक्यात बॅट टाकून हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली.प्रदीप जयसिंग इंगळे (48) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, हा खून मयताचा सख्खा भाऊ व वरणगाव ऑर्डनन्समधील काडतूस चोरी प्रकरणातील संशयीत सतीश जयसिंग इंगळे यांनी केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
आर्थिक वादातून केली हत्या
वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक 44 टाईप थ्रीमध्ये प्रदीप जयसिंग इंगळे हे वास्तव्यास होते व वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर पदावर नोकरीवर होते. बुधवारी ते ड्युटीवर गेले व दुपारी ते जेवणासाठी घरी आल्यानंतर भाऊ सतीश इंगळे यांच्यासोबत वाद झाला. यावेळी लाकडी बॅट डोक्यात मारल्याने व घाव वर्मी बसल्याने प्रदीप इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस अधिकार्यांची धाव
खुनाची माहिती कळताच भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, वरणगावचे सहा.निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी धाव घेतली.


