अवैध मार्गाने मिळवलेले कोणतेही यश भविष्यात अडचणीचे : प्रा.व.पु.होले


फैजपूर (12 सप्टेंबर 2024) : विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास व मेहनतीने प्रयत्न करून मिळवलेले यश भविष्यात आपले जीवन उजवल करते तर अवैध मार्गाने मिळवलेले कोणतेही यश भविष्यात अडचणीचे ठरते, असे विचार लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा.व.पु.होले यांनी व्यक्त केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार अरुण पाटील यांनी विद्यर्थ्यांनी मोठे अधिकारी व डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी, देशसेवा करून आपला नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी गुणवंत विद्याथी हे विद्यार्थी देशाची संपत्ती असून देशाचे उद्याचे भविष्य त्यांचे हाती आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक जाणीव ठेवून आई-वडिलांना विसरू नये व आपले व्यक्तिमत्त्व अष्ट पैलू बनवावे, असेही ते म्हणाले. विद्यार्यांना रोख बक्षीस प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


सभासदांना 12 टक्के लाभांश
फैजपूरचे कला शिक्षक राजेंद्र गुलाबराव साळी यांना कला क्षेत्रातील सर्वोकृष्ठ कामगिरीबद्दल मोठा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.गौरव उमेश चौधरी यांना कन्या रत्न पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !