भुसावळात ऑल इंडिया संविधान आर्मीतर्फे खड्ड्यांची निघाली अंत्ययात्रा

माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्या नेतृत्वातील आंदोलनाने पालिकेचे डोळ्यात घातले झणझणीत अंजन


Funeral procession of Khatdis by All India Constitution Army in Bhusawal भुसावळ (13 सप्टेंबर 2024) : शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यानंतर भुसावळ पालिका प्रशासनाला दुरुस्तीची जाग येत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी र ऑल इंडिया संविधान आर्मी व दहा संघटनांच्या वतीने माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात खड्ड्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली शहरवासीयांचे या आंदोलनांनी लक्ष वेधले. पालिका प्रशासनाने दोन दिवसात शहरातील रस्त्यांची डागडूजी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

भुसावळा निघाली खड्ड्यांची अंत्ययात्रा : आंदोलनाने वेधले लक्ष
शहरातील माजी नगरसेवक व कामगार नेते जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बसस्थानकापासून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रतीकात्मक तिरडीत खड्ड्यांचा निषेध म्हणून फुले टाकण्यात आली तर आंदोलकांच्या हातात विविध फलक होते. त्यात पालिका व लोकप्रतिनिधींचा निषेध करीत शहरवासीयांना शुद्ध पाणी द्यावे, भुसावळ शहरातील खड्डेमय रस्त्यांची गिनीज बुकात नोंद करावी, शहर स्वच्छ व सुंदर करावे, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी आदी मागण्या होत्या. आंदोलनकर्त्यांच्या अग्रभागी डफ वाजवून लक्ष वेधण्यात आले तर प्रतीकात्मक अंत्ययात्रेत शववाहिनीचा समावेश होता.


प्रतीकात्मक अंत्ययात्रेचे दहन
भुसावळ बसस्थानकापासून आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीपर्यंत येणार्‍या प्रत्येक खड्ड्यांचे फुले टाकून पूजन करण्यात आले. नाहाटा चौफुलीवर प्रतीकात्मक अंत्ययात्रेचे दहन करण्यात आले तर तीन दिवसानंतर शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास खांदे उतरवण्याचा कार्यक्रमही खड्ड्यात करू, असा इशारा जगन सोनवणे यांनी दिला. प्रतीकात्मक अंत्ययात्रेची तिरडी ऑल इंडिया संविधान आर्मी अध्यक्ष जगन सोनवणे, राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, आरीफ शेख यांनी धरली.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात नारायण सपकाळे, भुसावळ तालुकाध्यक्ष चेतन सुरवाडे, वरणगाव शहराध्यक्ष शगीर शहा, दीपक सोनवणे, नारायण सपकाळे, सम्राट बनसोडे, सचिन बाहरे, अजीज बाबा, अल्लाबक्ष बागवान, अलीम बागवान, इम्रान बागवान, साहिल बागवान, चंद्रकांत कोळी, विजय बर्‍हाटे, कैलास भोळे, गोपी साळी आदींनी सहभाग नोंदवला.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !