177 दिवसांनी दिलासा : मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
Relief after 177 days: Arvind Kejriwal granted bail in liquor policy case नवी दिल्ली (13 सप्टेंबर 2024) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवार, 13 सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला असून तब्बल 177 दिवसांनी त्यांना दिलासा मिळाला आहे. ईडी प्रकरणात जामीन देताना ज्या अटी घालण्यात आल्या त्याच अटी न्यायालयाने जामिनासाठी घातल्याचे सूत्र म्हणाले.
हा तर सत्याचा विजय : आप
ईडी व सीबीआयने केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना 12 जुलै रोजी ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. ‘आप’ने जामीन मंजूर होताच या निर्णयाचे वर्णन सत्याचा विजय असे केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना 21 मार्च रोजी दारू धोरण प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर 26 जून रोजी सीबीआयने त्यांना तुरुंगातून ताब्यात घेतले.