पारोळा पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 19 दुचाकीसह चोरट्याला अटक

Great achievement of Parola Police : Thief arrested with 19 stolen bikes पारोळा (13 सप्टेंबर 2024) : पारोळा पोलिसांनी नाशिकच्या सातपूरमधील आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चोरी केलेल्या तब्बल 19 दुचाकी जप्त केल्या. किशोर संजय चौधरी (रा.तरवाडे, ता.पारोळा, ह.मु.सातपुर कॉलनी, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे
गोपनीय माहितीवरून कारवाई
आरोपी किशोर चौधरी हा नाशिक शहरातून व इतर परीसरातून दुचाकी चोरुन पारोळा तालुक्यातील आडगाव, तरवाडे, शिवरे व परीसरात कमी किंमतीत विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती तसेच दुचाकी विक्रीसाठी पारोळा हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला.

पारोळा गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजु विठठल जाधव, हवालदार प्रवीण पाटील, संदीप सातपुते, अभीजीत पाटील यांनी आरोपी किशोर संजय चौधरी यास गुरुवार, 12 रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरातून पकडलत. आरोपीने नाशिक शहर हद्दीतून व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरी केलेल्या 19 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
