समाजमनाचे प्रतिबिंब उमटणारे साहित्य रसिकांच्या पसंतीस उतरते : फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे


भालोद (13 सप्टेंबर 2024)  : साहित्य हे समाजाचे वैचारिक भरण पोषण करून रंजन करणारे एक प्रभावी माध्यम आहे. साहित्यातून जीवनात सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. ज्या साहित्यातून समाज मनाचे प्रतिबिंब वास्तव पद्धतीने उमटत असते ते साहित्य रसिकांच्या लोकप्रियतेस पात्र ठरते, असे प्रतिपादन फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी केले. ते श्रीमती शीतल शांताराम पाटील लिखीत ‘चाहाय’ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास व संवर्धन केंद्राने आयोजित केलेल्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लीलाधर चौधरी होते. ‘चाहाय’ कथासंग्रहाच्या लेखिका शीतल शांताराम पाटील, संस्थेचे व्हा-चेअरमन मोहन चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल चौधरी, सचिव नितीन चौधरी ,प्राचार्य डॉ. के.जी .कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. लेखिका शीतल शांताराम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन लीलाधर चौधरी यांनी लेखिका आणि साहित्यकृतीस शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक दर्जेदार साहित्य कृतींचे वाचन केले पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक मराठी विभागातील प्रा.डॉ.दिनेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी यांनी केले. विभाग प्रमुख प्रा.डॉ.जतीन मेढे, निलेश मिस्त्री, भरत चौधरी आदींनी परिश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !