उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले : मुख्यमंत्री शिंदे यांच्याच संकल्पनेतून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना


Uday Samanta clearly said: CM Shinde’s own concept of Chief Minister Ladki Bahin Yojana मुंबई (13 सप्टेंबर 2024) : राज्यात सर्वदूर लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून आता महायुतीत धुसफूस सुरू आहे. मंत्री उदय सामंत यांनी यावरुन प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

महायुतीत सुरू आहे टोलबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओवरुन लाडकी बहीण नक्की कोणाची असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’ असे संवाद या जाहिरातींमध्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत. महिलांच्या बँक खात्यात येणारे 1500 रुपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे, असा संवाद दिसत आहे. यावरुन महायुतीतील नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरू झाली.

संकल्पना मुख्यमंत्र्यांचीच
शुक्रवारी पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आलेली योजना आहे. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुमख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी ही योजना स्विकारली. त्यानंतर तो विषय कॅबिनेटसमोर आला. कॅबिनेटसमोर विषय आल्यानंतर तिथेही ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे, असा विषय झाला. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली. त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयवादात जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून आलेली संकल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली आणि कॅबिनेटने त्याला मंजूरी दिली, असंही उदय सामंत म्हणाले.


कॉपी करू नका.