कोरपावली शेत शिवारात शेतात काम करतांना 44 वर्षीय इसमाला सर्पदंश

0

यावल (15 सप्टेंबर 2024) : शहरातील रहिवासी मोहम्मद इसाक मोहम्मद युसूफ (44) हे शनिवारी सकाळी कोरपावली शेतशिवारात कामाला गेले होते. शेतात काम करत असतांना गवतात त्यांच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला.

हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचाराकरिता तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिरिचारिका नेपाली भोळे,अमोल अडकमोल आदींनी त्याच्यावर उपचार केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.


कॉपी करू नका.