भुसावळातील : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नॅक पियर टीमची भेट
भुसावळ (15 सप्टेंबर 2024) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बंगलोर येथील नॅक संस्थेच्या टीम पाहणीकरीता दाखल झाली. आंध्रप्रदेशातील डॉ.अब्दुल हक उर्दू विद्यापीठ, कुंनुरचे कुलगुरू प्रोफेसर पी.फजुल रहमान, कोईम्बतूरच्या सेलवन भारतीयार विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ.राजा सर्वणा, कर्नालच्या डीएव्ही कॉलेजचे प्राचार्य डॉ.यशपाल शर्मा आदींनी 11 व 12 सप्टेंबर 2024 यांनी दोन दिवस पाहणी केली.
विविध विभागांची केली पाहणी
कमेटीने प्राचार्य हितगुज, नॅक कटेरियाननुसार सभा, आयक्यूएसी समन्वयक व सभासद सभा, ऑफिसमध्ये कार्यालयीन अधीक्षक, अकाउंट विभागास भेट, सर्व शैक्षणिक विभाग प्रेझेंटेशन, क्रीडा, एनएसएस, विद्यार्थी विकास विभाग यांना भेटी दिल्या व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थ्यांशी, खेळाडू यांच्याशी चर्चा केली. ही भेट ही तिसर्या सायकलसाठी होती.

या सर्व प्रक्रियेत प्राचार्य डॉ.राजू फालक, समन्वयक प्रा.डॉ.अंजली पाटील, सहसमन्वयक प्रा.दीपक जैस्वार, महाविद्यालयीन नॅक समिती सदस्य प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, तब्रेज खान, तसेच शिक्षकेतर कर्मचारी पराग पाटील, युवराज चौधरी, किरण पाटील, मिलिंद नेमाडे, प्रकाश चौधरी, प्रमोद नारखेडे, राजेश पाटील, विजय पाटील, दीपक महाजन, सुधाकर चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर आदींनी परिश्रम घेतले.




