हिंदी भाषा ही रोजगार देणारी भाषा : भुसावळात प्राचार्य रमेश जोशी

0

भुसावळ (15 सप्टेंबर 2024) : हिंदी भाषा देशात सर्वाधिक बोलली जाणारी व सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून रोजगार दरणारी समृद्ध भाषा आहे. हिंदी भाषा शुद्ध बोलण्यासाठी पुस्तकांचे वाचन करावे व रोजगार मिळवण्यासाठी हिंदीत कोर्सेस करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी येथे केले.
श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

प्रमुख वक्ता म्हणून डॉ.पूनम त्रिवेदी यांनी ‘हिंदी भाषा का इतिहास’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना सुरुवातीपासून हिंदी भाषा कशी विकसीत झाली याबाबत माहिती दिली. हिंदी सप्ताह अंतर्गत डॉ.पूनम त्रिवेदी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.अनुपम शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध सुलेखन स्पर्धा, काव्य गद्य वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, शोधनिबंध व घोषवाक्य या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सूत्रसंचालन प्रा.अनुपम शर्मा तर आभार प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी मानले.


कॉपी करू नका.