दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा

0

नवी दिल्ली (15 सप्टेंबर 2024) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी दोन दिवसात जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

कार्यालयात केली राजीनाम्याची घोषणा
कथित मद्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजीनाम्याची घोषणा केली. दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या, असेही ते म्हणाले.

केजरीवाल म्हणाले, कारण ते अप्रामाणिक
आज मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना प्रामाणिक मानता की गुन्हेगार मला दिल्ली आणि देशातील जनतेला विचारायचे आहे की केजरीवाल प्रामाणिक आहेत की गुन्हेगार? मित्रांनो, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला तुरुंगाच्या आतून सरकार का चालवता येत नाही, असा सवाल केला, तर आम्ही सरकार चालवू शकतो हे सिद्ध केले आहे. मी सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला तर घाबरू नका. आम आदमी पक्षाने त्यांचा नवा फॉर्म्युला फेल केला आहे. त्यांच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आज आम आदमी पक्षाकडे आहे कारण आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते अप्रामाणिक आहेत.

निर्दोष मुक्तता होईपर्यंत खुर्चीवर बसणार नाही
केजरीवाल म्हणाले की, देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही, खुर्ची सोडेन. त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. पण मला कोर्टातून जामीन मिळाला. मी न्यायालयाचा खूप आभारी आहोत. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही, असे माझे मन सांगत आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

 


कॉपी करू नका.