राज्याची सत्ता हातात द्या ; महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार : शरद पवार
राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार उवाच : बहिणींची अब्रु वाचवण्याची गरज : सत्ताधार्यांना सत्तेचा उन्माद : निवडणुकीत मतदारांना सत्ता उलथवण्याची संधी
Give the power of the state ; The face of Maharashtra will remain unchanged : Sharad Pawar शिंदखेडा (15 सप्टेंबर 2024) : राज्यात आता गुंडगिरीचे राज्य सुरू झाले असून सत्ताधार्यांकडून सत्तेचा गैरवापर सुरू झाला आहे. हे सरकार बहिणींना दिड हजार रुपये देणार आहे मात्र आता बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा घणाघात राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी रविवारी शिंदखेडा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात केला.
बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही महायुती सरकारवर टीका केली. बहिणींची अब्रु वाचवण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी यावेळी म्हटलं. शिंदखेड्यातील मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, सरकारला शेतकर्यांबाबत आस्था नाही. मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले. रोजगार दिला नाही. गेल्या 20 वर्षांत काहीच विकास झाला नाही, असेही पवार म्हणाले.
राज्यात सत्तेचा गैरवापर : गुंडगिरी वाढली
शरद पवार म्हणाले की, राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू झाली असून गुंडगिरी सुरू झाली आहे तर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले आहेत. दमदाटी करण्याचे प्रकार वाढले. लोकांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार होऊ लागले. मात्र, सत्ता ही लोकांच्या कामांसाठी असते. पण काही लोकांकडे सत्ता हातात आल्यानंतर सत्ता डोक्यात शिरते आणि सत्तेचा गैरवापर होतो. सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. ती सत्ता उद्या संधी मिळाल्यानंतर त्यांच्या हातातून काढून घेणं आणि महाविकास आघाडीच्या हातात देणं हे काम तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्याशिवाय राहणार नाही, असेंही शरद पवार म्हणाले.