पथराडच्या तरुणाचा विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू

0

A stone-throwing youth died due to electric shock धरणगाव (15 सप्टेंबर 2024) : विजेचा धक्का लागल्याने समाधान भागवत पाटील (29, रा.पथराड, ता. धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 15 रोजी सकाळी 10 वाजता घडली. याबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

विद्युत शॉक लागल्याने मृत्यू
समाधान पाटील हे पथराड येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. ते जैन कंपनीत कामाला आहेत. रविवारी सकाळी पथराड येथे त्यांच्या घराशेजारी मित्रासोबत विद्युत बोर्डाचे काम करीत होते परंतु त्याचवेळी त्यांना विजेचा धक्का लागल्याने ते दूर फेकले गेले. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले. समाधान यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घटनेबद्दल पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 


कॉपी करू नका.