आपले सरकार आणल्यास जुनी पेन्शन योजना लागू करणार ! : उद्धव ठाकरे यांची ग्वाही

0

The old pension scheme will be implemented if your government brings it! : Testimony of Uddhav Thackeray कोपरगाव (16 सप्टेंबर 2024) : महायुतीचे सरकार घालवून आपले सरकार आणल्यास निश्चितपणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल, अशी ग्वाही कोपरगाव येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवारी कोपरगावी झाले. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

भूलथापांवर विश्वास ठेवू नका
ठाकरे आपल्या शैलीत म्हणाले की, आता निवडणुका तोंडावर आहेत, एक-दोन दिवसांत सत्ताधारी कॅबिनेट बोलावतील जुनी पेन्शन योजना लागू केली, म्हणून भूलथापा देतील, त्यातही दगाफटका करतील. तुमची एकजूट फोडण्याचे काम सुद्धा केले जाईल, परंतु तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा, एकजूट कायम ठेवा, हे सरकार बदला व आपले सरकार आणा. मी तुम्हाला पेन्शन देईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन कर्मचार्‍यांना दिले. संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले, सरकारने लागू केलेली सुधारित पेन्शन योजना (यूपीएस) राज्यातील कर्मचार्‍यांना मान्य नाही.


कॉपी करू नका.