धुळ्यात 24 लाखांच्या रसायनांची परस्पर विक्री : प्रोडक्शन मॅनेजरसह सहा जणांविरोधात गुन्हा


Mutual sale of chemicals worth 24 lakhs in Dhule : Case against six persons including production manager धुळे (16 सप्टेंबर 2024) : अवधान एमआयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनीच्या प्रोडक्शन मॅनेजरसह सहा जणांविरोधात कंपनीच्या 24 लाखांचे रसायन परस्पर विक्री केल्याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पाच संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
धुळ्यातील अवधान एमआयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनीकडून रसायनांचा पुरवठा केला जातो मात्र या कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर श्याम भावराव पाटील यांनी विजय विष्णू शेवाळे, संजय दौलत जाधव, फिरोज युसूफ शाह, अख्तर शाह, सनी कुडाळकर आदींनी संगनमत करून रसायनाची परस्पर विक्री करून सुमारे 24 लाख 18 हजारांची फसवणूक केली. संशयीतांनी 4 सप्टेंबर 2024 रोजी कंपनीचे रसायन बेकायदेशीररीत्या फिरोज शाह यांच्याकडे पाठवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच संशयीतांना अटक
या गुन्ह्यातील पाच संशयीतांना मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, उपनिरीक्षक अशोक पायमोडे, कर्मचारी संदीप कदम यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केली असून ठाण्यातील रहिवासी असलेल्या संशयीत सनी कुडाळकरला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाल्याचे समजते.


कॉपी करू नका.