दुचाकीस कट मारल्याने अपघात यावल शहरातील दाम्पत्य जखमी
यावल (16 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळ असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर दुचाकीद्वारे दर्शनासाठी गेलेल्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला परतीच्या मार्गावर कारने कट मारला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. हा अपघात शनिवार, 14 सप्टेंबर रोजी घडला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातात दाम्पत्य जखमी
आडगाव, ता.यावल येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर आहे. या मंदिरावर दर्शनासाठी रवींद्र मधुकर बारी (56, रा.संभाजी पेठ, यावल) हे त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन गेले होते. दरम्यान दर्शन घेऊन परत येत असतांना मनापुरी गावाजवळ त्यांना चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच. 18 ए.जे. 7945) वरील अज्ञात चालकाने दुचाकीला कट मारला. या अपघातामध्ये रवींद्र बारी व त्यांची पत्नी हे दोघे जखमी झाले.
दोघांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी रवींद्र बारी यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चारचाकी (वाहन क्रमांक एम. एच. 18 ए.जे. 7945) वरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे.