वादग्रस्त विधान भोवले : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

0

Controversial statement : Case registered against Shinde group MLA Sanjay Gaikwad बुलढाणा (17 सप्टेंबर 2024) : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटणार्‍यास 11 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले होते. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरुन ही माहिती देण्यात आली.

11 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा
बुलढाणा येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून जे त्यांच्या पोटात होते, ते आता बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणार्‍या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला मी 11 लाख रुपये देणार.


कॉपी करू नका.