कोट्यवधी रुपयांचे सोने लांबवणार्या सुवर्ण कारागीराला ओरीसात बेड्या
सांगली (19 सप्टेंबर 2024) : सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ओरीसातून एका सुवर्ण कारागीराला बेड्या ठोकल्या आहेत. आटपाडी येथील सराफांचे कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन पसार झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
असे आहे फसवणूक प्रकरण
आटपाडी येथील गौतम दास व सौरभ दास या बंगाली कारागिरांनी अनेक वर्षे वास्तव्य करत सराफांचा विश्वास मिळवला. चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते. नुकतेच सराफाकडून अडीच कोटी रुपये किंमतीचे साडेतीन किलो सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते. सराफ महेश्वर जवळे यांनीही बंगाली कारागीराांनी पावणेचार कोटींची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली होती.





