दीपनगर कामगार कल्याण केंद्रातर्फे नेत्र तपासणी शिबिर

0

Eye check up camp by Deepnagar Labor Welfare Centre भुसावळ (20 सप्टेंबर 2024) : दीपनगर कामगार कल्याण केंद्रात गुरुवार, 19 रोजी परिसरातील अधिकारी, कंत्राटदार मजूर, कर्मचारी यांच्यासाठी मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपनगरचे कल्याण अधिकारी पंकज सनेर होते.

70 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
कंत्राटी वीज कामगार संघटनेचे सचिन भावसार, गुणवंत कामगार प्रफुल्ल आवारे यांची उपस्थिती होती. जळगावचे डॉ.राहुल पवार आधुनिक मशिनद्वारे डोळे तपासणी केली. या शिबीराचा 70 रुग्णांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन केंद्र संचालक किशोरकुमार मनोहर पाटील यांनी केले. शारदा भावसार व ललित माळी, प्रवीण महाजन यांनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.