भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
Inauguration of Acharya Chanakya Skill Development Center at P.O. Nahata College, Bhusawal भुसावळ (20 सप्टेंबर 2024) : कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राचे उद्घाटन दुरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नाहाटा महाविद्यालयात व्यासपीठावर संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, खजिनदार संजय नाहाटा, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील तसेच महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.एस.डी.येवले उपास्थित होते.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
भुसावळ तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, बापू महाजन, अॅड.बोधराज चौधरी, आचार्य चाणक्य कौशल केंद्र जळगावचे नोडल अधिकारी व ग्रुप इन्स्ट्रक्टर अनिल कोल्हे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सचिन येवले तर सूत्रसंचालन डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले. प्रा.जी.आर.वाणी, प्रा.डॉ.किरण वारके, डॉ.ममता पाटील, डॉ.मनोज जाधव, प्रा.संगीता भिरूड, प्रा.पूनम महाजन, प्रा.प्रशांत पाटील, डॉ.सचिन कोलते, डॉ.अजय क्षिरसागर, डॉ.सचिन राजपूत, प्रा.खिलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.




