रेल्वेचा पुन्हा ब्लॉक : भुसावळ विभागातून धावणार्‍या दोन गाड्या रद्द तर सात गाड्यांचे बदलले मार्ग

रेल्वे प्रवाशांची गैरसोय : तीन गाड्या उशिराने धावणार

0

Railway block again : Two trains running from Bhusawal section were canceled and seven trains were rerouted भुसावळ (20 सप्टेंबर 2024) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दुहेरीकरण कार्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे विभागात दौंड आणि मनमाड विभागातील राहुरी आणि पाडेगांव स्थानकांदरम्यान दुहेरीकरणासाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे 22 ते 23 सप्टेंबर दरम्यान दोन रेल्वे गाड्या रद्द तर सात गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत शिवाय तीन गाड्या उशिराने धावणार आहे. भुसावळ विभागातून धावणार्‍या या गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

या गाड्या रद्द
गाडी क्रमांक 02132 जबलपूर-पुणे विशेष गाडी 22 रोजी तर 02131 पुणे-जबलपूर विशेष गाडी 23 सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

सात गाड्यांचे बदलले मार्ग
17629 पुणे-नांदेड एक्सप्रेस 21 व 22 रोजी कुर्डुवाडी-लातूर रोड-परळी-परभणीमार्गे धावेल तर गाडी क्रमांक 17630 नांदेड-पुणे एक्सप्रेस 21 व 22 रोजी परभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी दौंड मार्गे धावणार आहे. गाडी क्रमांक 12779 वास्को दि गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस 22 रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे नियमित मार्गाने धावणार आहे. गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस 21 रोजी मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन ऐवजी इगतपुरी, कल्याण, पनवेल मार्गे पुण्याला जाईल तर गाडी क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस 22 रोजी मनमाड, कोपरगाव, अहमदनगर दौंड कॉर्डलाईन ऐवजी इगतपुरी, कल्याण, पनवेल, पुणे मार्गे पुढे नियमित मार्गाने धावेल. गाडी क्रमांक 22690 यशवंतपूर-अहमदाबाद एक्सप्रेस 22 रोजी पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे पुढे नियमित मार्गाने धावणार आहे तर गाडी क्रमांक 20658 हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस 22 रोजी इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड मार्गे पुढे नियमित मार्गाने धावणार आहे.

तीन गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक 11025 पुणे-अमरावती हुतात्मा एक्सप्रेस 23 सप्टेंबर रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा तीन तास 30 मिनिटे उशीराने पुणे स्थानकावरून सुटेल तर गाडी क्रमांक 12627 बेंगलोर-नई दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस 22 सप्टेंबर रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा चार तास उशीराने बेंगलोर स्थानकावरून सुटेल तर 05290 पुणे-मुज्जफरपूर विशेष गाडी 23 सप्टेंबर रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा आठ तास उशिराने पुणे स्थानकावरून सुटेल.


कॉपी करू नका.