हिंगोणा येथे गवत आणायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणाला सर्पदंश

0

यावल (21 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील हिंगोणा येथील 21 वर्षीय तरुण हा शेत शिवारामध्ये गवत कापण्यासाठी गेला असता उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून हिंणोगा प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहे.

शेतात काम करताना सर्पदंश
हिंगोणा गावातील रहिवाशी शाहरुख सिकंदर तडवी (21) वर्ष हा तरुण शुक्रवारी शेत-शिवारामध्ये गुरा-ढोरांसाठी गवत आणायला गेला असता गवत कापत असतांना त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे आणण्यात आले. डॉ.फिरोज तडवी यांनी प्रथमोपचार केले. तरुणाची प्रकृती बिघडत असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय यावल येथे हलवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल नरवाडे -पाटील, अधिपरिचारिका मंजूषा कोळेकर आदींनी उपचार केले. तरुणाची प्रकृती सद्या स्थिर आहे.


कॉपी करू नका.