दिल्लीच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदी आतिशी


Atishi as the 17th Chief Minister of Delhi नवी दिल्ली (21 सप्टेंबर 2024) : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांची निवड करण्यात आल्यानंतर शनिवारी त्यांनी पदाची शपथ घेतली. राज निवास येथे एलजी विनय सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीनंतर आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पायाला स्पर्श केला. त्या दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसर्‍या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या.

मुकेश अहलावत यांना संधी
आतिशी यांच्यानंतर सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हे एकमेव नवीन चेहरा आहेत.

यांची सोहळ्याला उपस्थिती
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आतिशी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

 


कॉपी करू नका.