दिलीप खोडपे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ! : जामनेरात मंत्री गिरीश महाजनांविरोधात फुंकणार तुतारी

0

Dilip Khodpe in Sharad Pawar’s NCP ! : Trumpet will be blown against Jamnerat Minister Girish Mahajan जामनेर (21 सप्टेंबर 2024) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भाजपला जय श्रीराम केल्यानंतर शनिवार, 21 रोजी राष्ट्रवादी-शरचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी तुतारी फुंकली. दरम्यान, खोडपे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मंत्री महाजनांविरोधात लढत देतील हे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार गटात केला प्रवेश
काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जामनेर तालुक्यातील वजनदार नेते दिलीप खोडपे यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला होता. खोडपे यांनी आपण लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने त्यांनी शनिवारी जामनेर येथे आयोजीत कार्यक्रमात हातामध्ये तुतारी घेतली. शिवस्वराज्य यात्रेतील कार्यक्रमात त्यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला

यांची होती उपस्थिती
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्याथ प्रदेशाध्यक्ष योगेश गव्हाणे, जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे यांनी या पक्षात प्रवेश घेतला. जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले तेव्हा उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट केला. प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार एकनाथराव खडसे, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, रवींद्रभैय्या पाटील, एजाज मलीक, श्रीराम पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 


कॉपी करू नका.