29 वर्षीय तरुणीची हत्या करीत अवयव फ्रीजरमध्ये ठेवले : बेंगळूरूतील घटना
बेंगळूरू (21 सप्टेंबर 2024) : 29 वर्षीय तुरुणीच्या मृतदेहाचे 30 तुकडे करून ते फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याची संतापजनक घटना बेंगळुरूमधील मल्लेश्वरममधून समोर आली आहे. या घटनेने दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलिसांनी तपासाच्या कारणास्तव मुलीचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.
तीन महिन्यांपूर्वीच तरुणी प्लॅटमध्ये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे दोन आठवड्यांपूर्वीच तुरणीची हत्या करण्यात आली आहे. तिची ओळख पटली असून तपासाच्या कारणास्तव अधिक माहिती शेअर करण्यात आलेली नाही. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तीन महिन्यांपूर्वीच या फ्लॅटमध्ये बाड्याने राहण्यासाठी आली होती.





