रावेरात धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन

एस.टी.चे जातीचे प्रमाणपत्र मागणी : आंदोलनामुळे महामार्ग झाला ठप्प


रावेर (24 सप्टेंबर 2024) : धनगर समाजाला एस.टी.जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजातर्फे शासकीय विश्रामगृहाजवळ सोमवार, 23 रोजी बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे मेंढपाळ बांधव मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होवून दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या.

आंदोलनामुळे वाहतूक ठप्प
रावेर तालुक्यातील धनगर समाजातर्फे रावेरात बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली. सुमारे एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी धनगर समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. धनगर आणि धनगड हे एकच असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने याची दखल घेऊन देशभरात धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांतर्फे यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना देण्यात आले.


यांचा आंदोलनात सहभाग
धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, बाजार समिती संचालक जयेश कुयटे, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सावळे, गणेश बोरसे,
डॉ.भगवान कुयटे, अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे, अ‍ॅड.बी.डी.निळे, हिलाल सोनवणे, लक्ष्मण सावळे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तुषार कचरे, शुभम नमायते, स्वप्नील लासुरकर, ज्ञानेश्वर केळकर, दिलीप अंजलसोंडे, दिगंबर बोरसे, शालिक सावळे, प्रवीण सावळे, रमेश सावळे, ईश्वर निळे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यांनी ठेवला बंदोबस्त
पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, सचिन घुगे, विशाल पाटील, समाधान ठाकूर, राहुल परदेशी, चैतन्य पाटील आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !